
मुंबई–कोरोना या आजारामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या महामारी पासून बचाव करण्यासाठी राज्यात आणि देशात वेगवेगळे प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला व सोशल डिस्टन्सिंग तसेच वारंवार हात धुणे या सारख्या सवयींचा घरी राहूनच अवलंब करण्याची सूचना करण्यात आली. पण या दिवसात लोकांचे मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे व कोरोनाची भीषणता लक्षात घेता लोकांच्या मनात वेगळीच चिंता निर्माण होत आहे यावर उपाय म्हणून राज्य सरकारने कोरोनामुळे चिंताग्रस्त झालेल्या लोकांना मानसिक आधार देण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे.
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या या नंबरच्या माध्यमातून आत्तापर्यंत दीड हजारपेक्षा जास्त लोकांचे समुपदेशन केले आहे. 1800-120-820050 या नंबर वर संपर्क साधून लोकांना आपल्या समस्यांचे निराकरण करता येणार आहे. कोरोना या आजाराने तुम्हाला जास्त चिंताग्रस्त केले असेल तर त्यावर योग्य समुपदेशन केले जाणार आहे. त्यामुळे कोरोना या विषाणूमुळे तुम्हाला जास्त चिंताग्रस्त होण्याची गरज नाही.






