
बुलडाणा :- राज्यात कोरोणाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असताना बुलडाणा जिल्ह्यात विशेषतः शहरात याचा प्रसार वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत पाच कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले होते. मात्र, रविवारी आलेल्या अहवालानुसार आणखी तीन रुग्णांची भर पडली. दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमावरून परतलेले हे तीन व्यक्ती चिखली, देऊळगावराजा आणि खामगाव येथील असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
बुलडाणा जिल्ह्यातील पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या आता आठवर पोहचली असून जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब आहे.
या आधी बुलडाणा शहरातील एका 45 वर्षीय व्यक्तीचा कोरोना प्रादुर्भाव झाल्याने मृत्यू झाल्याची घटना 29 मार्च रोजी घडली होती. त्यानंतर त्या व्यक्तीच्या संबंधित तसेच अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या व्यक्तींचे नमुने पाठविण्यात आले होते. दरम्यान, बुलडाणा शहरातील नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान दिल्ली येथील मरकज या धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्यांपैकी चिखली, देऊळगावराजा आणि खामगाव येथील प्रत्येकी एक असे तीन व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत.
यामुळे बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्या आता 8 वर गेली असून, त्यातील एक जण आधीच मृत झालेला आहे. कोरोना बाधीतांच्या संपर्कामुळे जिल्ह्यातील पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे कळते. यामुळे, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे झाले असून प्रशानस आता काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या जगभरात कोरोना विषाणु सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भारत लॉकडाऊन केला आहे. महाराष्ट्रात देखील लॉकडाऊन व जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे.परंतु बुलडाणा जिल्ह्याची परिस्थिति बघता प्रशासनाने जिल्हा बंदीचा फास अधिक घट्ट करवा अशी प्रशासनाला विनंती भाजपा जिल्हाउपाध्यक्ष सुनील हासणराव देशमुख यांनी केली आहे.
लॉकडाऊन केल्या मुळे अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचे प्रशासनाच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे. तरीही अनेक लोक काही ना काही निम्मित करुण पेट्रोलपंप,मेडिकल,बाजार आदी ठिकाणी जाऊन गर्दी करत असल्याचे दिसून येते आहे. हे चुकीचे असून शहरातील नागरिकांनी विशेषता तरुणांनी
परिस्थिति चे गाम्भीर्य लक्षात घेता विनाकारण घराच्या बाहेर येणे टाळावे. तसेच या काळात पोलिस,डॉक्टर,पत्रकार व सर्वच अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानून करत असलेल्या कार्याला सलाम देखील केला.
नागरिकांनी प्रशासनाला घरात बसून सहकार्य करावे. अशी प्रतिक्रिया ही यावेळी युवाप्रगती शी बोलताना भाजपा युवा नेते सुनील देशमुख यांनी दिली.











