सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत ४१ वरुन थेट २६ वर

नवी दिल्ली – कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत भारताने ४१व्या क्रमांकावरून २६ क्रमांक गाठल्याने चिंतेत वाढ झाली आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ती रोखण्याचे मोठे आव्हान भारतापुढे आहे.त्यासाठी सर्व भारतीयांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आगामी पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

कोविड-19 या विषाणूचा उगम चीनमधील वुहान शहरातून झाला. जागतिक क्रमवारीत सर्वात पुढे असणाऱ्या चीनने गेल्या महिनाभरात कोरोना प्रसार रोखण्यात मोठे यश मिळविले असून आता हा देश सहाव्या क्रमांकापर्यंत खाली आला आहे. इतर देशांमधील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या आणि चीनने मिळविलेले नियंत्रण लक्षात घेता, चीनचा लवकरच आपली क्रमवारी आणखी खाली आणण्यात यशस्वी होईल, अशी खात्री चीनच्या राज्यकर्त्यांना वाटत आहे.

कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत चीननंतर इटलीचा क्रमांक लागत होता. मात्र अमेरिका व स्पेनने आता इटलीलाही मागे टाकले आहे.

कोरोनाबाधित देशांची क्रमवारी, त्या देशातील कोरोनाबाधितांची व मृतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

अमेरिका – 3,67, 004 (10,871)

स्पेन – 1,36,675 (13,341)

इटली – 1,32,547 (16,523)

जर्मनी – 1,03,375 (1,810)

फ्रान्स – 98,010 ( 8,911)

चीन – 81,740 (3,331)

इराण – 60,500 (3,739)

यू. के. – 51,608 (5,373)

टर्की – 30,217 (649)

स्वित्झर्लंड – 21,657 (765) 

बेल्जियम – 20,814 (1,632)

नेदरलँड – 18,803 (1,867)

कॅनडा – 16,667 (323)

ऑस्ट्रीया – 12,297 (220)

ब्राझील – 12,232 (566)

पोर्तुगाल – 11,730 (311)

दक्षिण कोरिया – 10,331 (192)

इस्राईल – 8904 (57)

स्वीडन – 7206 (477)

रशिया – 6,343 (47)

ऑस्ट्रेलिया – 5,895 (45)

नॉर्वे – 5,865 (76)

आयर्लंड – 5364 (174)

चेक रिपब्लिक – 4,822 (78)

चिली – 4815 (37)

भारत – 4,778 (136)

वरील आकडेवारीत अन्य देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची आकडेवारी कमी दिसत असली तरी प्रगत राष्ट्रांनी कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविल्यामुळे त्यांच्याकडील आकडे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्या मानाने भारताची कोरोना चाचण्यांची क्षमता खूपच कमी आहे. भारतातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढेल तसतशी ही आकडेवारीही वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.