पर्यावरण प्रेमींना धक्का; हायकोर्टाने सर्व याचिका फेटाळून लावल्या

मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडची उभारणी करण्यासाठी आरे कॉलनीमधील दोन हजार १८५ झाडे तोडण्याचा आणि ४६१ झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) घेतला होता. या विरोधात विविध चार याचिका दाखल झाल्या होत्या. झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी मुंबई हायकोर्टाने वैध ठरवली. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे आणि पर्यावरणप्रेमी ‘आरे’ आंदोलकांना मोठा धक्का बसला आहे. 

पर्यावरणप्रेमी आरे आंदोलकांची मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे घोर निराशा झाली आहे. मात्र अजूनही सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याचा मार्ग त्यांच्यासमोर आहे.