
मुंबई – महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
आज महाराष्ट्रात २२९ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे ही संख्या वाढली आहे.
करोनामुळे आज दिवसभरात २५ जणांचा मृत्यू झाला.
आता राज्यात करोनाग्रस्तांची संख्या १३६४ झाली आहे.
आज जे २५ मृत्यू झाले त्यामध्ये १५ पुरुष तर १० महिला आहेत. २५ मृत रुग्णांपैकी १२ जण ६० वर्षांवरील वयाचे आहेत.
मृतांपैकी ११ जण ४० ते ६० या वयोगटातले आहेत. तर मृतांमधले दोघेजण हे ४० वर्षांच्या खालील होते. २५ मृतांपैकी २१ जणांना मधुमेह, अस्थमा, हृदयविकार यांसारखे आजार होते असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.






