
मुस्कुरायेगा इंडिया हारेगा कोरोना
मुंबई: मुंबईतील सात तरुण कलाकारांनी मिळून कोरोना विरुद्ध लढण्यासाठी “मुस्कुरायेगा इंडिया” या बॉलिवूड कलाकारांच्या विडिओवर आधारित नवीन संगीतमय कलाकारी पेश करण्यात आली आहे. ही सगळी मुलं वय वर्षे 18 ते 22 या वयोगटातील असून सदर व्हिडिओची संकल्पना ही अमेय ठाकरे या तरुणाची आहे. हे सगळे तरुण मुंबईतील प्रगती फाऊंडेशन या संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणून सामाजिक कार्य करीत असतात.
या व्हिडिओ बद्दल सांगताना प्रगती फाऊंडेशनचे सन्मव्यक श्री चिन्मय चव्हाण यांनी सांगितले की, लोकांमध्ये कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे तसेच सर्वचजण लॉक डाऊन मध्ये आपापल्या घरी राहून कोरोना विरुद्ध लढाई लढत आहे. अशावेळी सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्सेस, पोलीस वर्ग आणि विविध सामाजिक संस्था रस्त्यावर उतरून कोरोनाची लढाई लढत आहेत. ते आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या रक्षणासाठी दिवसरात्र झगडत आहेत. त्यांना मानवंदना देण्यासाठी आणि कोरोना विरूद्ध जनजागृती करण्यासठी प्रयत्न केला आहे.
या व्हिडिओची मूळ संकल्पना अमेय ठाकरे याची असून त्याच्याबरोबर त्याचे सहकारी मित्र धैरणी सावंत, गौरवी मोरे, यज्ञेंश मोरे, जिग्ना गोहिल, आर्षी गौतम, सुमन बिस्वास व स्वतः अमेय ठाकरे यांचा समावेश आहे. हा व्हिडिओ घरी राहूनच बनविला असल्याचे अमेय ठाकरे यांनी सांगितले.











