इंजिनियर मारहाण प्रकरण: ‘CCTV फुटेज ताब्यात घ्या’, उच्च न्यायालयाचे आदेश

जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका अभियंत्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाने सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे.

हे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन दंडाधिकाऱ्यांकडे सादर करावेत असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

स्थापत्य अभियंता अनंत करमुसे याने या प्रकरणामध्ये उच्च न्यायलयामध्ये याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करावे तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे) द्यावा अशी मागणी या करमुसे यांने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.

न्या.गिरीश कुलकर्णी यांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.