
मुंबई – करोनाच्या तडाख्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पण सचिनचे चाहते मात्र आपल्या देवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
सचिनचा जबरा फॅन असलेला अभिषेक साटम याने एक अतिशय अप्रतिम अशी कलाकृती साकारली आहे.
संपूर्ण जगावर करोनाचं सावट असल्याने सचिनच्या वाढदिवसाला दरवर्षीप्रमाणे मोठं आर्ट वर्क करता येणार नाही, म्हणून त्याने सचिन करोनारूपी चेंडू टोलवतो असल्याचे एक पिक्सच्या मदतीने आर्ट वर्क तयार केले आहे.
त्याने त्या कलाकृतीचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे.












