Corona Update: मुंबईत करोनाचे २८१ नवे रुग्ण,१२ जणांचा मृत्यू, संख्या ४८०० च्या वर

मुंबई – करोनाचे २८१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून चोवीस तासात करोनामुळे १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या ही आता ४ हजार ८७० इतकी झाली आहे.

१६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

आत्तापर्यंत मुंबईतील ७६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज झालेल्या १२ रुग्णांचा मुंबईत मृत्यू झाला,त्यातील सहा रुग्णांना गंभीर आजारांचा पूर्व इतिहास होता तर चार जण हे वयस्कर होते.

१२ मृत रुग्णांपैकी नऊ रुग्ण हे पुरुष होते तर तीन रुग्ण या महिला होत्या.