मुंबईतील ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र’ (IFSC) गुजरातला हलवणार

मुंबई:

केंद्र सरकारने आज (१ मे) महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच राज्याला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत होणारे ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र’ अर्थात ‘आयएसएससी’ आता गुजरातला हलवण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. २७ एप्रिल रोजी काढलेल्या केंद्राच्या अधिसूचनेनुसार आता ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र’ आता गुजरात गांधीनगरला हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळते. विशेष म्हणजे या IFSC केंद्रामुळे १ लाख नव्या नोकऱ्यांची निर्मिती होणार होती. मात्र, हे केंद्र महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आल्याने आता याचा फायदा गुजरात राज्याला होणार आहे.

‘आंतरराष्ट्रीय सेवा केंद्रा’बाबत चर्चेला २००६ साली सुरुवात झाली होती. वर्ल्ड बँकेचे अर्थतज्ज्ञ पर्सी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुंबईत हे IFSC केंद्र उभारण्याची शिफारस केली होती. मुंबईचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हे केंद्र मुंबईला सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. या IFSC केंद्रासाठी मुंबई हेच योग्य ठिकाण असल्याचे देखील त्यावेळी स्पष्ट सांगण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकारने आता हे IFSC केंद्र महाराष्ट्र मुंबईहून गुजरातला हवलण्याचा निर्णय घेतल्याने राज्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.