
बदलापूर – येथे राहणारे मध्यमवर्गीय लोटन सोनार यांचा मुलगा चेन्नईला ट्रेनिंगसाठी गेला होता.

२४ मार्च रोजी देशात लॉकडाउन घेण्यात आल्यामुळे तो तिकडेच अडकून राहिला. मग त्याला राहण्यापासून खाण्यापर्यंत अनेक अडचणी सुरू झाल्या.
अखेरीस लोटन यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मदतीची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ संबंधित मंत्र्यांच्यासाह्याने मुलाला मदत पोहचवून राहण्याची व्यवस्था केली.
पोटच्या गोळ्याला मदत केल्यामुळे बापाने गहिवरून मुख्यमंत्रांना पुन्हा एक पत्र पाठवले.
यामध्ये त्यांनी मनोभावाने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद म्हटले आणि असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही, अशी भावना व्यक्त केली.
या ईमेलमध्ये लोटन म्हणाले की, “आसा मोहरा झाला नाही कधीही न होणार, उद्धवजी हे नाव जगात गर्जत राहणार. कोटी कोटी धन्यवाद.”











