अबब! राज्यात कोरोनाबाबतचे ९५ हजार गुन्हे दाखल-गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – राज्यावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे.राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोनासंदर्भातील ९५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या. त्यात ६६३  व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लाँक डाऊन संपले असे नाही.

उलट या काळात  सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे