दहावीचा निकाल 8 जून रोजी

बारावीचा निकाल लागल्यापासून दहावीच्या निकालाची प्रतिक्षा सुरू झाली होती. निकाल आज लागणार उद्या येणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली सोशल मीडियावर तारखा पडू लागल्यामुळे अनेकजण बुचकाळ्यात पडले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल 8 जूनला लागणार असल्याचे जाहीर केल्यामुळे सर्व चर्चेला पूर्णविराम मिळला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षा निकाल 8 जूनला दुपारी 1 वाजता लावणार असल्याचे विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांनी निवेदनाद्वारे कळविले.