मान्सून केरळात धडकला!

गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने आणि उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तसेच बळीराजासाठीही ही आनंदाची बातमी आहे . मान्सून केरळ आणि लक्षद्वीपमध्ये धडकला आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीवरही पावसाला सुरूवात झाली आहे. आता लवकरच पाऊस महाराष्ट्रातही बरसेल अशीही माहिती स्कायमेटने दिली आहे. 

देशात यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यात कमी पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. आता मान्सून केरळात दाखल झाला आहे त्यामुळे तो महाराष्ट्रातही दाखल होईल यात शंकाच नाही