जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठ देवनार गोवंडी येथे वृक्षारोपण

मुंबई : दिनांक ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठ देवनार गोवंडी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना या पृथ्वीतलवार मानवाचे अस्तित्व जणू धोक्यात आले आहे. अशा वेळी निसर्ग संवर्धनास हातभार लावणे हे परम कर्तव्य समजून श्री स्वामी समर्थ मठ देवनार गोवंडी यांच्या मार्फत वृक्षारोपण करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशिअल डिशटांसिंगचे सर्व नियम पाळून तसेच तोंडाला मास्क लावून विभागातील नागरिकांनी वृक्षारोपण केले. यावेळी श्री अंकुश नाईक, दर्शन खांड्रे, ऍड. पटेल, समीर लालझारे, अभिषेक चव्हाण, वेंगुर्लेकर सर व इतर स्वामी सेवक यांनी सेवा बजावून वृक्षारोपण केले.