धक्कादायक! अभिनेता सुशांत राजपूत याची त्याच्या राहत्या घरी आत्महत्या

मुंबई: हिंदी सिने सृष्टीतील तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आज त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

काय पो चे या चित्रपटाद्वारे सुशांत सिंह याने बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यानंतर पी के, छी छो रे, एम एस धोनी अनटॉल्ड स्टोरी अशा अनेक यशस्वी चित्रपटात काम केले होते. तरुण पिढीतील एक यशस्वी कलाकार म्हणून सुशांत सिंह यांनी ओळख निर्माण केली होती. याशिवाय टीव्ही मालिकांमधून अभिनय केला होता.

आज वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी सुशांत सिंह यांनी गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण सिने सृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.