
कोरोनामुळे हाहाकार माजविला असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होवू पाहत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होवू नये म्हणून देशात आणि राज्यात टपप्याटप्प्याने जवळपास अठ्याहत्तर दिवसांचा लॉक डाऊन जाहीर झाला. याकाळात अनेक उद्योग धंदे बंद झाले, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. राज्यात अनेक युवक युवती लॉक डाऊन मध्ये बेरोजगार झाले. अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. त्यामुळे या समस्येला वाचा फोडण्याचे कार्य आर पी आय (आठवले गट) कार्यकर्ते चंदुदाद जगताप यांनी हाती घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना श्री. जगताप यांनी सांगितले की, नोंदनीकृत सुशिक्षित बेरोजगार असलेल्या युवक -युवतीना या कोविड-१९ च्या महामारी मुळे तसेच लाँकडाऊन मुळे अनेक बेरोजगाराना उपासमारीची वेळ आली आहे.अशा परस्थिती मध्ये मानसिक संतुलन ढळुन अनेक जन चुकीच्या मार्गाने पोटाची उपजीविका भागवण्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करू शकतात.
बेरोजगारीने त्रस्त झालेला युवक वर्ग गुन्हेगारी मार्गाकडे वळु शकतात. आज त्यांच्या समोर रोजच्या जगण्यामरणाचा प्रश्न उभा राहीला असुन , अनेकांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे.
अशा वेळी राज्य सरकार ने तात्काळ बेरोजगार भत्ता देण्यात यावा अशी मागणी राज्यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यंमत्री अजित पवार यांना निवेदन सादर करून मागणी करणार आहे.
श्री. चंदू दादा जगताप हे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) रोजगार आघाडीचे प्रदेश अद्यक्ष आणि आँल इंडिया लेबर एम्प्लाँईजच्या युनियन च्या स्किल आणि रोजगार डिविजन चे अद्यक्ष आहेत.










