
नवी मुंबई: वाशी येथील सेंट लॉरेन्स हायस्कूलने विध्यार्थ्याच्या प्रवेशासाठी अजब नियम काढला आहे. शाळेत मुलांच्या प्रवेशासाठी आई आणि वडील दोघेही उपस्थित आवश्यक आहे. फक आई किंवा वडील या दोघांपैकी एकच असल्यास त्या विध्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. आश्चर्य म्हणजे शाळेच्या प्राचार्याशी संपर्क केला असता त्यांनी असे सांगितले की, ही शाळेची प्रवेश प्रक्रिया आहे. प्रवेशासाठी आई वडील या दोन्ही पालकांनी उपस्थित असणे आवश्यक आहे नाहीतर प्रवेश मिळणार नाही. जे घटस्फोटीत आहेत किंवा ज्या मुला मुलींचे आई किंवा वडील नाही त्यांनी काय करावे? शाळेच्या या निर्णयामुळे नवी मुंबईतील नागरिकांमध्ये असंतोष आहे. शिक्षण विभाग यावर काही कारवाई करणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत.






