
ठाणे येथे पूर्व द्रुतगती मार्गावर भारत जय हिंद पार्टीकडून काही काळ चक्का जाम करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्या. पोलिसांनी काही काळातच कार्यकर्त्यांना बाजूला केले आणि रस्ता मोकळा केला.
भारत बंदला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नेये यासाठी राज्यभारत विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातल भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक बाजार समित्या बंद आहेत. मार्केटमध्ये अगदीच तूरळक प्रमाणात लोक दिसतआहेत.
नागपूर येथील संत्रा बाजार सुरु. मात्र, बंदच्या पार्श्वभूमीवर व्यवहारांना व्यापारी, ग्राहक, दुकानदारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळता आहे.
कांद्याची मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात शेतकरी बंदला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. नाशिक कृषी उत्पन्न बजार समितीमधील व्यवहार ठप्प असल्याचे पाहायला मिळत आहे.
बुलढाण्यात भारत बंद रेल्वो रोको आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आले. त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या ट्रॅकवर उतरुन रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅकवरुन पोलिसांनी पांगवले गेले






