सलमान खान,करण जोहर आणि संजय लीला भंसाळीसह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने केलेल्या आत्महत्येप्रकरणी सलमान खान, कारण जोहर, एकता कपूर आणि संजय लीला भन्साळी यांच्यासह आठ जणांविरोधात बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधीर कुमार ओझा या वकिलाने या कलाकारांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 306,109,504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुशांत सिंह राजपूत याला सात वेगवेगळ्या सिनेमातून वगळण्यात आले.

तसेच त्याचे काही सिनेमे प्रदर्शित सुद्धा झाले नाहीत. त्यामुळे सुशांतने असे टोकाचे पाऊल उचलले असा आरोप सुधीर कुमार ओझा यांनी केला आहे.