
जवानांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न HOW IS THE JOSH
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (3 जुलै) सकाळी अचानक लेहमध्ये पोहोचले. 15 जूनला भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. 15 जूनच्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला होता.

या भेटीनंतर मोदींनी जवानांना संबोधित केलं. ते म्हणाले, “गलवान खोऱ्यात भारताच्या जवानांनी जे धैर्य दाखवलं, त्यामुळे देशाला तुमचा अभिमान वाटतो.”
तसेच चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिला की, चीनची विस्तारवादी रणनीती चालणार नाही. दरम्यान जवानांनी वंदे मातरम् आणि भारत माता की जय अशा घोषणा देवून परिसर दान दाणून सोडला.

सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता निमु इथं आहेत. पहाटेच ते इथे पोहोचले. पंतप्रधान मोदी सध्या लष्कर, हवाई दल आणि ITBP च्या जवानांशी संवाद साधत आहेत.”












