
संयुक्त प्रवेश परीक्षा JEE (जेईई) मुख्य आणि राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा NEET (नीट २०२०) आता सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. मानव संसाधन विकास आणि राष्ट्रीय चाचणी एजन्सीने विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी नीट 2020, जेईई 2020 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केला.
जेईई मुख्य परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान घेण्यात येईल, तर JEE प्रगत परीक्षा 27 सप्टेंबरला तर NEET परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे.











