पहिल्या T-20 सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय, विराट नाबाद 94 लोकेश राहुलच अर्धशतक

हैदराबाद: भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिज संघावर ६ गडी राखून सहज मात केली आहे. कर्णधार विराट कोहलीची नाबाद ९४ धावांची खणखणीत खेळी आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विंडीजचे २०८ धावांचे मोठे आव्हान १८.४ षटकांत सहज पार केले. भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात २०९ धावा करत विजय साकारला व मालिकत १-० अशी आघाडी घेतली.

विराटने त्याच्या टी-२० कारकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्याने ५० चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकार ठोकून नाबाद ९४ धावा केल्या तर लोकेश राहुलने ४० चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांनिशी ६२ धावांची सुरेख खेळी केली. विशेष म्हणजे भारतीय या विजयाबरोबच टी-२०त सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे.