
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतना दिसत आहे. मात्र, मुंबईकरांना (Mumbai) दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. मुंबईत आज 477 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या 2 लाख 87 हजार 303 वर पोहचली आहे. यांपैकी 10 हजार 988 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 66 हजार 695 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नसून नागरिकांची कोरोनाच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 17 लाख 61 हजार 615 वर गेली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.54 टक्के इतका झाला आहे. तर, राज्यातील मृत्यू दर हा 2.56 टक्के एवढा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे.
मुंबईत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असून महापालिकेनं सुरू केलेल्या ५१७ पैकी ४६५ कोविड सेंटर बंद करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत केवळ ५२ कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे त्यातले ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणं नाहीत.
दरम्यान कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह आढळण्याचं प्रमाण ३५ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आल्यानं मुंबईत दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झालीय. जगभरात कोरोनाची अनेक मोठया शहरांत दुसरी लाट आल्यानं पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आलीय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनंही खबरदारी म्हणून बंद करण्यात आलेली कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू करता येतील अशा स्थितीत ठेवलीयत.










