Bharat Biotech निर्मित Covaxin च्या सकारात्मक परिणाम

भारतीय बनावटीच्या लसी संबंधित एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. आयसीएमआर आणि भारत बायोटेक (ICMR-Bharat Biotech) यांनी एकत्रितपणे विकसित केलेल्या Covaxin या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स भारतात सुरु होत्या. लसीच्या सकारात्मक परिणामांमुळे या लसीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, अशी माहिती ICMR ने दिली आहे.

ICMR-Bharat Biotech ने एकत्रितपणे कोविड-19 विरुद्ध बनवलेल्या कोवॅक्सिन लसीने यशस्वी टप्पा गाठला आहे. भारतामध्ये झालेल्या ट्रायल्सच्या डेटावरुन ही लस अगदी सुरक्षित असून लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. 

Covaxin च्या फेज 1 आणि फेज 2 च्या ट्रायल्सचे रिझल्ट्स खूप चांगले आल्यामुळे भारतात फेज 3 चे क्लिनिकल ट्रायल्स सुरु झाले आहे. हे ट्रायल्स भारतातील 22 वेगवेगळ्या साईट्सवर चालू आहेत. या भारतीय लसीने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे