
सौरव गांगुली आपल्या घरातील जीममध्ये वर्कआऊट करत असताना त्याला हार्ट अॅटक आला. त्यानंतर तातडीने त्याला कोलकाता येथील Woodlands hospital मध्ये दाखल करण्यात आले. गांगुलीवर अॅँटीओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
“सौरव गांगुलीचे अँजिओप्लास्टी झाली असून तो स्थिर आहे. 24 तास त्याला वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येईल. त्याच्या हृदयातील दोन ब्लॉकेजेस दूर करण्यात आले. सोमवारी यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल. तसंच तो सेटल होणं हे प्राधान्य असेल.सध्या तो बोलतही आहे,” अशी माहिती डॉ. आफताब खान यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
दरम्यान बुधवारी सौरव गांगुली यांनी ईडन गार्डनला भेट दिली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी साठी त्यांनी तयारीचा आढावा घेतला होता. तसेच क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या प्रेसिडंट सोबतहीचर्चा केली होती. मागील काही दिवसांपासून सौरव गांगुली यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. पश्चिम बंगाल मध्ये राज्यपालांची भेट घेतली होती. यामुळे ते भाजपात प्रवेश करत आहेत का? असा अनेकांच्या मनात प्रश होता. पण राज्यपालांनी भेटायला बोलावल्यानंतर त्यांची भेट घ्यावीच लागते असे बोलून थेट राजकारण प्रवेशाबद्दलच्या चर्चांवर बोलणं टाळलं होतं. बंगालच्या राज्यपालांनी त्यानंतर ट्वीट करत या भेटीबाबत बोलताना ईडन गार्डनला भेट द्यायला आवडेल असे म्हटलं होतं.











