
आय. टी. एम. ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन आणि स्वराशि नेत्रालय हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य

नवी मुंबई : वाशी रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशन, वाशी रेल्वे स्थानक येथे प्रगती फाऊंडेशन आणि मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय यांच्या सयुंक्त विध्यमाने शुक्रवार दिनांक ८ जानेवारी २०२१ रोजी मोफत नेत्र चिकित्सा तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबिराला स्वराशी नेत्रालय हॉस्पिटल, आणि आय. टी. एम. ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन (एज्युकेशन पार्टनर) यांचे सहकार्य लाभले.
सदर आरोग्य शिबिरात डोळ्यांसंबधित वरील विविध तपासण्या करण्यात आल्या, तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

सदर शिबीर वाशी लोहमार्ग पोलिस कर्मचारी व वाशी रेल्वे कर्मचारी साठी आयोजित करण्यात आले होते जवळपास शंभराहून अधिक कर्मचारिणी शिबिराचा लाभ घेतला आणि आपल्या नेत्र आरोग्यविषयीच्या समस्यांचे समाधन करून घेतले.
वाशी लोहमार्ग पोलिस स्टेशन चे वरीष्ठ ए पी आय श्री. विष्णू केसरकर यांनी शिबिरातील प्रत्येक विभागाला भेट देवून उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला. तसेच शिबिरातील उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारीशी संवाद साधला. सदर तपासणी मोफत उपलब्ध करून दिल्याने संस्थाचे आभार मानून कौतुक केले आणि भविष्यातही अशाचप्रकारे चांगले कार्य करत राह्ण्याचा शुभेछा दिल्या.

शिबिरात प्रगती फौंडेशनचे अध्यक्ष आणि आय टी एम हेल्थ सायन्स चे रजिस्ट्रार श्री. किरण राणे, प्रगती फाउंडेशन चे राकेश वाणी, अन्वर चिवेलकर आणि स्वराशी नेत्रालायचे डॉ सुधीर मिश्रा, विकास मेवारा, कैलास जोध, आदी मान्यवर शिबिरात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शिबिराचे आयोजक ए पी आय श्री विष्णू केसरकर, पी.एस.आय. आढाव, हवालदार बजरंग कांबळे यांनी उपस्थित सर्वांचे आणि सहयोगी संस्थाचे आभार मानले.











