Co-WIN ॲप डाऊनलोड करू नका, सरकारकडून अजून लाँच झालेले नाहीत

भारतातल्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने एक प्लॅटफॉर्म विकसित केलाय. याचं नाव – Co-WIN. म्हणजेच Covid Vaccine Intelligence Work.

पण सरकारचं हे अॅप अजून लाँच झालेलं नाही. तुम्हाला जर प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोरला Cowin या नावाची काही अॅप्स दिसत असतील, तर ते भारत सरकारचं अॅप नाही. ही अॅप बनावट असू शकतात आणि इथे तुम्ही जर स्वतःची माहिती भरलीत तर त्याचा गैरवापर होऊ शकतो, असं खुद्द सरकारने म्हटलंय.

भारत सरकारचा Co-WIN हा प्लॅटफॉर्म अजून सरकारी वापरापुरतीच मर्यादित आहे. म्हणजेच या प्लॅटफॉर्मवर सध्या सरकारी अधिकाऱ्यांद्वारे अशा लोकांची नोंदणी कऱण्यात येतेय, ज्यांना सगळ्यात आधी लस देण्यात येणार आहे.

म्हणूनच सामान्यांकडे सध्यातरी अॅप डाऊनलोड करून लशीसाठी नावनोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करायचा पर्याय नाही.