
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या आरोपीला गुजरात जामनगरमधून ताब्यात घेण्यात आलं असून मुंबई पोलीस पथक उद्या आरोपीसह मुंबईत दाखल होणार आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीच नावं मनोज दोढीया असून तो २० वर्षाचा आहे.
हे कृत्य का केलं याचा शोध मुंबई पोलीस करीत आहेत.
तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने गुजरात जामनगर मधून या आरोपीला अटक केली आहे.











