
मुंबई: गेल्या चोवीस तासापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानच्या एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.
हवामान खात्याने येत्या अठ्ठेचाळीस तासात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार असल्याचा ईशारा दिला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे. आज खोळंबलेल्या मुंबई पुणे मार्गावरील ट्रेन लक्षात घेऊन, दरम्यान खबरदारी म्हणून उदयाच्या मुंबई प्रगती एक्सप्रेस, सिंह गड एक्सप्रेस आणि पुणे – पनवेल- पुणे ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.






