तुम्हीच बना वाहतूक पोलीस! बेशिस्त वाहनचालकांना आकारा दंड!

मुंबई, शुक्रवार: वाहतूक पोलिसांनी नागरिकांद्वारे बेशिस्त वाहन चालकांना दंड आकारण्याची एक अभिनव योजना सुरु केली असून बहुसंख्य नागरिकांना ती ठाऊकच नसल्याचे निदर्शनास आले आहे.

‘नो पार्किंग झोन’मध्ये उभे केलेले वाहन, ‘नो एंट्री’ च्या रस्त्यावर एंट्रीच्या उलट्या दिशेने विसावलेले वाहन अथवा सिग्नल जंप करुन सुसाट निघालेले वाहन आदींच्या नंबर प्लेटचे आपण आपल्या मोबाईलवर छायाचित्र काढले आणि ते मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनच्या व्हाट्स अ‌ॅप नंबरवर पाठविले तर संबंधीत वाहनावर त्वरीत दंड आकारला जाऊन त्याची त्या वाहनाच्या नंबरवर नोंद होते. नंतर हा दंड वाहन मालकाकडून वसूल केला जातो. सदर व्हाट्स ॲप नंबर आहे: 8454999999. उचला तर मग मोबाईल आणि बना वाहतूक पोलीस.