
सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पर्वती विजयनगर जि प शिक्षकाला 87 देशातील 2500 स्पर्धकांतून आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. रणजित देसलेयांच्यानंतर बालाजी जाधव यांनी महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेआहे.

आमदार रोहित पवार, कपील पाटील यांनीही फेसबुक ट्विटर वरून कौतुकास्पद संदेश शेअर केले व सत्कार केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील बालाजी जाधव यांचा विशेष गौरव करण्यात आला. देशातील 15 पेक्षा जास्त प्रसार माध्यमातून याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्येही याबाबत बातम्या येत आहेत.

कोरोना काळात इंटरनेट किंवा नेटवर्क पुरेसा नसताना ऑडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा फोनवरून अभ्यास पूर्ण करून एक नाविन्यपूर्ण उपक्रम बालाजी जाधव यांनी राबविला आणि त्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रोजेक्टसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. बालाजी जाधव यांना HBN Creativities and exclusive हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे ही बाब महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आणि म्हणुनच राज्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बालाजी जाधव यांचा विशेष गौरव केला. त्यांना शुभेच्छा पत्र, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार एकनाथ गायकवाड, मुंबई कॉंग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष जयवंत लोखंडे आणि प्रगती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण राणे उपस्थित होते. याप्रसंगी बालाजी जाधव यांना प्रगती फाऊंडेशन या संस्थेमार्फत CERTIFICATE OF EXCELLENCE IN EDUCATION हे प्रमाण पत्र देवून गौरविण्यात आले तसेच बालाजी जाधव यांची संस्थेच्या ग्रामीण शिक्षण विकास सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.











