
आजपासून (16 जानेवारी) कोरना लसीकरण मोहिमेला भारतात सुरुवात होतेय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलं.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील कोरोना लसीकरण केंद्रांमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
नरेंद्र मोदी म्हणाले, “सगळेजण कोरोनाच्या लशीबद्दल विचारत होते. आता लस उपलब्ध झालीय. या क्षणी देशातील सर्व नागरिकांचे मी अभिनंदन करतो.”
जगातल्या इतर लशींच्या तुलनेत भारतातील लस सर्वात स्वस्त असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.
महाराष्ट्रातील लसीकरणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोव्हिड सुविधा केंद्रामध्ये झाले.
महाराष्ट्रातही कोरोना लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झालीय. केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महाराष्ट्रात 285 लसीकरण केंद्र तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 प्रमाणे 28 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आलंय.











