India Vs Australia: ब्रिस्बेन टेस्टच्या दुसर्‍या दिवशी भारत 62/2

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Bordar-Gavaskar Trophy) जिंकण्यासाठी भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात मनोरंजक लढत होत आहे. पहिले फलंदाजी करत कांगारू संघाने मार्नस लाबूशेनचे शतक, कर्णधार टिम पेनचे अर्धशतक आणि मॅथ्यू वेड व कॅमरुन ग्रीनच्या योगदानांमुळे आपल्या पहिल्या डावात 115.2 ओव्हरमध्ये 369 धावांचा डोंगर उभा केला आहे. प्रत्युत्तरात टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी 2 बाद 62 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी धाडलं आणि विरोधी संघाला दोन धक्के दिले. शिवाय, बाउन्सी खेळपट्टीवर भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले त्यामुळे, यजमान संघाचे पारडे जाड दिसत आहे. भारतीय संघाने गोलंदाजी, फिल्डिंग आणि फलंदाजी दोन्ही विभागात निराशाजनक कामगिरी केली.