
यजमान भारतीय संघाने पहिल्या डावात 329 धावांचा डोंगर उभारला आणि इंग्लंडला 134 धावांवर गुंडाळत मोठी आघाडी घेतली. त्यानंतर, टीम इंडियाने दुसऱ्या डावात 286 धावा केल्या आणि मिळालेल्या 195 धावांच्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते.
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते.
टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या.
या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.











