
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जुईनगर विभागाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नवी मुंबई शहर कार्यकारणीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष निखिल गावडे, उपशहर अध्यक्ष प्रशांत पाटेकर, शहर सचिव सुमित जाधव, शहर सचिव समृद्ध भोपी, शहर सहसचिव विवेक शिंगोटे, शहर सहसचिव ओंकार गंधे, शहर सहसचिव सुरज निकम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सोबत मनसे शहर सहसचिव अभिजित देसाई, महिला सेना उपशहर अध्यक्ष अनिथा नायडू, मनसे उपविभाग अध्यक्ष संदेश पाटील, मनसे शाखाअध्यक्ष अक्षय कदम हे उपस्थित होते.
या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन जुईनगर मनसे विभागअध्यक्ष अक्षय भोसले, उप विभागअध्यक्ष अजय मोरे, उप विभागअध्यक्ष मंगेश जाधव, शाखाअध्यक्ष मयूर कारंडे, शाखाअध्यक्ष संकेत बोडके, शाखाअध्यक्ष इरफान पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.










