
मुंबई – काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० चा शुभारंभ केला.
या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध १२ देशातून तब्बल १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असुन राज्यात उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे.
लाखो नवीन रोजगार उपलब्ध होणार असुन महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला बळकटी मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ देशातील उद्योग क्षेत्रातील व्यक्तींशी काल ऑनलाईन संवाद साधला.
मात्र कालच्या या संवादावेळी मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे असलेल्या बॅनरवर महाराष्ट्राचा नकाशा उलटा छापला आहे अशा पोस्ट फोटोसहीत सोशल मीडिया वर फिरत आहेत.
या फोटो वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्रोल केले जात आहे.
मात्र त्या फोटो मागचं व्हायरल सत्य काही वेगळंच आहे.
महाराष्ट्राचा नकाशा उलटा लावला हे नक्कीच सत्य आहे. पण त्यामागील कारण वेगळे आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन संवाद साधत होते. त्यामुळे समोरून जे व्यक्ती बोलत आहेत त्यांना सर्व चित्र आरशाप्रमाणे उलट दिसत होते.
महाराष्ट्राचा नकाशा जर आहे तसा लावला असता तर समोरच्या व्यक्तीला तो मित्र इमेज मध्ये उलटा दिसला असता म्हणून तो नकाशा उलटा करून तिथे लावण्यात आला होता जेणेकरून तो समोरच्या व्यक्तींना खरा नकाशा आहे तसा दिसायला हवा.
याविषयी बोलाताना अनेक जणांनी हा प्रश्न देखील उपस्थित केला की, जर मिरर इमेज मुळे नकाशा उलटा लावला असेल तर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची नेमप्लेट सरळ कशी ? त्या नेमप्लेटवर मुख्यमंत्र्यांचे नाव उलटे का नाही ? तर विषय असा आहे की ती नेमप्लेट ही समोरच्या व्यक्तीला दिसणार नव्हती. कारण ती नेमप्लेट लॅपटॉपच्या मागच्या बाजूला ठेवलेली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे नाव आहे तसेच ठेवण्यात आले होते.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खुप मोठी चूक केली या आरोपात काहीही तथ्य नसुन विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
महाराष्ट्र उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे
व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत काल शुभारंभ करण्यात आला.
यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार तसेच अनेक उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते. विविध 12 देशांतील गुंतवणुकदारांसोबत 16 हजार 30 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.
अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थित व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
सामंजस्य करार झालेल्या कंपन्या आणि गुंतवणूक रक्कम पुढीलप्रमाणे आहेत :
एक्सॉन मोबिल(अमेरिका)ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड 760 कोटी.
हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक-2, पुणे 250 कोटी आणि 150 रोजगार
असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे 560 कोटी
वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया- सुपा, अहमदनगर 820 कोटी
हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक- भिवंडी- चाकण तळेगाव 150 कोटी आणि 2500 रोजगार
असेट्ज (सिंगापूर)डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे 1100 कोटी आणि 200 रोजगार
इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन – रांजणगाव, पुणे 120 कोटी आणि 1100 रोजगार
पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो-तळेगाव 1000 कोटी रोजगार 1500
इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड 1500 कोटी आणि रोजगार 2500
रॅकबँक(सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे 1500 कोटी
युपीएल( भारत) केमिकल- शहापूर, रायगड 5000 कोटी आणि रोजगार 3000
ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव- पुणे 3770 कोटी आणि 2042
मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० च्या माध्यमातून इतर देशांच्या तुलनेत आपल्या राज्यात परकीय गुंतवणूक वाढ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.










