शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते अनावरण

मुंबई – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज, शनिवारी अनावरण करण्यात आले.

बाळासाहेबांच्या ९५ व्या जयंती निमित्त दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील फोर्ट परिसरात हा सोहळा पार पडला.

यावेळी दिग्गज सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. शरद पवार, देवेद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, राज ठाकरे,आदित्य ठाकरे, अमित ठाकरे,संजय राऊत,प्रविण दरेकर, रश्मी ठाकरे,एकनाथ शिंदे व इतर दिग्गज मंडळी मंचावर उपस्थित होते.

जेष्ठ मूर्तिकार शशिकांत वडके यांनी बाळासाहेबांचा ९ फुटांचा ब्रॉंजचा पुतळा साकारला आहे.

बाळासाहेबांच्या ९५ व्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.