प्रगती फाऊंडेशन मार्फत कुंभवडे गावातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

वैभववाडी प्रतिनिधी
प्रगती फाऊंडेशन मुंबई या सामाजिक संस्थेमार्फत वैभववाडी तालुक्यातील कुंभवडे सोनाळी गावच्या सर्व विद्यार्थ्यांना अध्यक्ष किरण राणे यांच्या हस्ते शालेय वस्तू वाटप करण्यात आले.


यावेळी संचालिका सिध्दी राणे, केंद्र प्रमुख गोसावी सर, माजी सरपंच वैशाली सांवत, मुख्याध्यापक गजानन अडुळकर, शिंदे मॅडम, परशुराम आमकर, रमेश कुळये, प्रभाकर सांवत, प्रमोद सावंत आदी कुंभवडे सोनाळी गावातील ग्रामस्थ विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते.


प्रत्येक विद्यार्थ्याला स्कूल बॅग, छत्री, नोट बूक, डायरी, पेन्सिल, रबर, पेन, वह्या , टॉवेल, साबण, वॉटर बॉटल आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक शाळा कुंभवडे येथे करण्यात आला होता.कुंभवडे व सोनाली गावातील जवळपास शंभर मुला मुलींना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.