
मतिमंद मुलं वाढवणं, ही खरंच तारेवरची कसरत असते. या मुलांना वाढवताना समाजाच्या काहीशा उत्सुक आणि सहानुभूतिपूर्ण, तर क्वचित उपहासात्मक नजरांचा सामना करताना त्यांच्या पालकांची ओढाताण होत असते. अशी मुले जन्माला आल्यानंतर त्यांचा सांभाळ करणे बऱ्याच वेळा कठीण होते आणि त्यामुळेच अशा मुलांना काही पालक आश्रमात किंवा सुधार केंद्रात दाखल करतात. यात त्यांच्या आईवडिलांचा तसा काही दोष नसतोच मुळी तरी त्यांना हे अग्निदिव्य पार पाडावं लागतं.

या विशेष मुलांसाठी काहीतरी करावे असे सर्वांना वाटते पण सर्वांना तेथे पोहोचणे शक्य होत नाही.पण कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने अशा मुलांना मदत व्हावी या उद्देशाने २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धनकवडी येथील मधुबन मतिमंद व बहुविकलांग संस्थेमधील सर्व मुलांना बेडशीट व खाऊ वाटप करण्यात आले. या मुलांचा आनंद द्विगुणित व्हावा आणि आपुलकीच्या भावनेतून मुलांसोबत वेगवेगळ्या खेळाचा आनंदही लुटला यावेळी त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याजोगा होता.
यावेळी संस्थेमार्फत आयोजित रक्तदान शिबिरात कोकण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. यावेळी सागर खोले, योगेश गवळे आदी संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते











