डॉ भास्कर धाटावकर लेखमाला : राष्ट्रीय जीवनात अभिलेखांचे महत्त्व – 3 

सम्राट अशोक जगाला माहिती कशी उजेडात आली

सम्राट अशोक हा हिंदुस्थानाचा मानबिंदू! अशा सुपरिचित आणि इतिहास प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाची भारतीय इतिहासात ओळखच नव्हती हे जर आज सांगितले तर आपला विश्वास बसेल काय? नक्कीच नाही पण मित्रांनो हकिकत तशीच होती.आता आजचा लेखातून ही बाब समजून घेऊन ऐतिहासिक अस्सल साधने अप्रकाशित इतिहासावरील साचलेली धुळ स्वच्छ करून त्यातील वस्तुनिष्ठ सत्य इतिहास कसा प्रकाशमान करतात हे लक्षात येईल.

इतिहास म्हणजे ‘ इति — अ — हास ‘, असे असे घडले.या इतिहास लेखनाची ” संशोधन, लेखन, विश्लेषण व त्यावरील भाष्य अशी इतिहास लिहिण्याची चतु:सुत्री आहे आणि सर्वात महत्त्वाचे इतिहाचार्य वि.का.राजवाडे यांनी सांगितल्याप्रमाणे No documents No History हे मूलभूत तत्व अतिशय महत्त्वाचे आहे.

एकदा का हे तत्व स्विकारून अस्सल कागदपत्रांद्वारे संशोधन, लेखन केले कि सत्य इतिहास प्रकाशित करण्यास मदत होत असते आणि या ह्यष्टीकोनातूनच राष्ट्रीय जीवनात अभिलेखांचे महत्त्व अधोरेखित होत असते.

सम्राट अशोक स्तंभ
अशोक स्तंभ

सम्राट अशोक! आज त्यांच्या दैदीप्यमान कारकीर्दीचा डंका जगभरात वाजत असला तरी 1830 पर्यन्त तो अज्ञातवासातच होता. भारतातील प्रत्येक स्तभांवर देवानपिय पियदस्सी राजा असा उल्लेख, संबोधन आढळून येत होते पण हा राजा कोण आहे? त्याचे नाव, गाव , राज्य कोणते? तो होता. भारतातील कि परदेशातून आला होता याची काहीच माहिती मिळत नव्हती पण या अज्ञात राजाविषयी उत्कंटा वाढतच होती आणि जिज्ञासा शमविण्यासाठी 1832 मध्ये श्रीलंकेत ईस्ट इंडीया कंपनीत काम करणारा  इंग्रज अधिकारी चार्लस् इनबोबरने यावर संशोधन सुरू केले होते. त्यानीच पुढे एका बौद्धभिक्कुच्या मदतीने पाली भाषेतील ग्रंथ महावंस अनुवादित करताना त्यांचा लक्षात आले कि देवानपिय हा राजा दुसरा तिसरा कोणी नसून याच देशातील महान पराक्रमी चक्रवती सम्राट अशोक आहे. उलगडा होत होता पण त्याचे तपशील अजूनही सुस्पष्ट व्हायचे होते. याबाबत ब्रिटिश अधिकारी चार्ल्स बोबबरच्या जिद्दीला, चिकाटीला आणि चिकित्सक बुध्दीला दाद द्यायलाच हवी. त्यानी खूप परिश्रमपूर्वक शोध लावला होता.

महावंस हा ग्रंथ ब्राम्ही लिपीत होता पाली भाषेला स्वतंत्र लिपी नव्हती. पुढे चार्ल्सचे कार्य 1837 मध्ये जेम्स प्रीन्सेपने पुढे चालू ठेवले आणि सात वर्षांच्या अथक प्रयत्नाने ब्राम्ही लिपीतील असंख्य मोठमोठाल्या शिला लेखांचे वाचन करून सम्राट अशोकाचा इतिहास जगाला ज्ञात करून दिला.अशी असते अभिलेखांची ताकद !

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन

मोबाईल 835 595 7451

Dr Bhaskar Dhatavkar