महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत प्रवेश

कल्याण – महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापनेपासून पक्षासाठी एकनिष्ठ काम करणारे मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पालक मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मलबार हिल येथील नंदनवन येथे जाहीर प्रवेश केला यामुळे डोंबिवलीतील मनसेमध्ये मात्र मोठे खिंडार पडले आहे.

विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश केल्याने मनसेला मात्र राजकीय धक्का सहन करावा लागणार असल्याची चर्चा सध्या कल्याण डोंबिवली मध्ये रंगू लागली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मधून मनसेचे आमदार राजू पाटील निवडून आल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे एक खाते उघडले गेले मात्र त्यानंतर दोन वर्षातच डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकाऱ्यांनी उपाध्यक्ष राजेश कदम यांनी मनसेच्या इंजिन वजन उतरुन शिवधनुष्य हाती घेतले आहे.