संजय राऊत शेतकरी आंदोलकांना भेटले

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीच्या गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली.

यावेळी त्याच्याबरोबर शिवसेनेचे इतर खासदारसुद्धा उपस्थित होते. राऊत यांनी यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली.

‘महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहीले. शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्ष प्रमुख मा.ऊध्दव ठाकरे यांच्या सूचनेवरून आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे,’ असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं.

त्यानंतर ते शेतकरी आंदोलकांच्या भेटीसाठी दुपारी 1 वाजता दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर गेले होते.