
आज बुलडाणा भाजपा तालुक्याच्या वतीने वाढीव वीजबिल सक्तवसुली तात्काळ थांबविण्यासाठी व वीजबिल माफीसाठी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून धाड येथील M.S.E.B महावितरणचे अभियंता श्री.कायंदे यांना निवेदन देण्यात आले. सदरील आंदोलन आ.श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनात व भाजपा तालुका अध्यक्ष ॲड.सुनील हासनराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हाउपाध्यक्ष श्री.देविदास पाटील जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रातील जनतेची विज देयके १०० युनिट वापरा पर्यंत माफ करण्यात येतील अशी घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. परंतु आता सामान्यांची विज देयके माफ करण्यात आलेली तर नाहीच. या उलटी सर्व विदयुत ग्राहकांना अव्वाच्यासव्वा बिले आकारण्यात आलेली असून महाविकास आघाडी सरकार वीजबिलाची सक्त वसुली करून सामान्य जनतेची नाहक पिळवणूक करत आहे.

विज देयके राज्यसरकारने केलेल्या घोषणे प्रमाणे माफ तर केलेली नाहीच उलट दिलेली वाढीव विज देयके हे भरावेच लागतील असे सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या ना.उर्जा मंत्री महोदयांनी सरकारी फतवा जाहीर करून. संपूर्ण महाराष्ट्रातील ७८ लाख सामान्य जनतेची विज कनेक्शन कापण्याचे काम सरकारद्वारे इमाने इतबारे सुरु आहे. महावितरण हे श्रीमंतांची विज कनेक्शन कपात तर नाहीच पण गोरगरीब शेतकरी,शेतमजूर यांचे वीज कनेक्शन मात्र नाहक कापत आहे. हा सामान्य जनतेवर होणार अन्याय भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही. वेळीच महावितरणने सामान्यांची सक्तीची विज वसुली व विज कनेक्शन कापण्याचे जुलमी कारस्थान न थांबवल्यास येणाऱ्या काळात या पेक्षाही तीर्व स्वरूपाचे जन आंदोलन बुलडाणा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने बिघाडी सरकारच्या व महावितरण च्या विरोधात छेडण्यात येईल. असा इशारा देखील तालुका अध्यक्ष ॲड.सुनील देशमुख यांनी M.S.E.B चे अभियंता श्री. कायंदे यांना दिला.
या व्यतिरिक्त महावितरणच्या भोंगळ कारभाराचे अनेक उदाहरणे व अडचणी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आहेत. रोहित्रांमध्ये टाकायला तेल नाही, नियोजन शून्य कारभारामुळे कृषी पंपाचे रोहित्रे सतत जळतात व ती वेळेवर बदलून मिळत नाही. अखंडित विज पुरवठा नाही. अनेक भागांमध्ये अघोषित लोडशेडिंग सदृश परिस्तिथी आहे. तिघाडी सरकारच्या व महावितरण च्या ढिसाळ कारभारामुळे जनता त्रस्त झालेली असून त्यांच्या प्रती सर्वसामान्य जनतेच्या मनात रोष याच्या आंदोलनात स्वयंमपूर्तीने उपस्थिती लावून जनतेने दाखवून दिले आहे. महावितरने आपल्या ढिसाळ कारभाराकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची खरी गरज आहे. तरी महावितरण प्रशासनाने या कडे लक्ष द्यावे व सामान्यांना चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी देखील प्रमुख मागणी यावेळी भाजपा च्या वतीने करण्यात आली. महावितरण कार्यालयाला टाळे ठोकताचं जमलेल्या नागरिकांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला यावेळी सामन्याचा सरकार प्रति जनाक्रोश प्रखर रित्या दिसत होता.

यावेळी बुलडाणा पंचायत समिती सदस्य संदीप उगले पाटील,श्री.प्रकाश पडोळे,जीतेंद्र जैन,किरण सरोदे,विशाल विसपुते,रमेश नरवाडे,अंकुश तायडे,हर्षल तायडे,विशाल तायडे,भगवानभाऊ सिनकर,शरद देशमुख, सुनील घोडकी,अर्जुन लांडे,अनिल पालकर, संतोष पालकर,भागवत पालकर,योगेश जाधव,संजय बोराडे,अनिल पाटील,मंगेश जाधव,शुभम भुतेकर,सचिन पवार,अमोल बारवाल,ज्ञानेश्वर राजपूत,मयूर पडोळ,अनिल माळोदे,गजानन देशमुख,विशाल,देवेंद्र पायघन,वरुड ग्रामपंचायत सदस्य मंजितराव काळे,अनिल उबाळे,दिलीप पांडव,राहुल सोनुने, सिद्धेश्वर लडके,अनिल जाधव,सुनील जाधव,भीमराव पाटील,सुनील जाधव,लिंबाजी उबाळे,जगदेव पंडीत,अनिल गुळवे,शेखर बोराडे,अंबादास उबाळे,राहुल गुळवे,अनिल उबाळे,संतोष पडोळे,श्रीरंग पडोळे,जीवन चांदा,प्रमोद वाघ,भगवान पिपळे,सुनील भिवसनकर,कैलास वाघ,श्रीरंग एन्डोले,टीका खान,बंडूभाऊ लकडे,राहुल सोनुने,माधवराव काळे,कमलाकरराव उबाळे, सुनील भिवसकर,गजानन मघाडे,सुरेश भिवसकर,राजू बुरजे,तसेच तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











