
लागणारे साहित्य
- 2 कप कणिक
- 1 कप बेसन पीठ
- 4 ते 5 हिरवी मिरची
- 1 इंच आले
- 6-7 लसुण पाकळ्या
- 1/2 टीस्पून जिरे
- 1/2 टीस्पून ओवा
- 1/ 2 टीस्पून हळद
- 1 टीस्पून लाल तिखट
- 1 टीस्पून पांढरे तीळ
- चवीनुसार मीठ
- आवश्क्तेनुसार पाणी
- 2 टेबलस्पून तेल
- तळण्यासाठी तेल
प्रथम मेथी स्वच्छ धून चिरून घेणे. नंतर गॅस वर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल घालावे. त्यात आले, लसूण, मिरची ची पेस्ट घालावी व त्यातच लगेचच हळद घालून हलवावे. त्यात मेथी घालावी व 2 मिनिट ती परतून घेणे. त्यात चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून हलवावे. व त्यात 3 चमचे बेसन पीठ घालून ती मेथी हलवून घेणे. 3 मिनिटे ठेवून गॅस बंद करावा.
परातीत कणिक व राहिलेले बेसन पीठ एकत्र करून घेणे. त्यात ओवा, जिरे, तीळ आणि तयार केलेले मेथीचे मिश्रण त्या पिठा मध्ये घालून ते एकजीव करून घेणे. आवश्यक असल्यास तिखट, मीठ घालावे. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून ते पीठ घट्ट मळून घेणे.
गॅस वर कढई मध्ये तेल घालून तापण्यास ठेवावी. व एका बाजूला मळून घेतलेल्या पिठाचे छोटे गोळे करून छोटे पुरी करून घेणे. किंवा एक मोठा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून त्याचे वाटीने गोल आकार करून घेणे.
सगळे पुरी लाटून घेतले कि तापलेल्या तेलात या पुरी मध्यम आचेवर तळून घेणे. पुरीला छान सोनेरी रंग येतो.
अशाप्रकारे सगळ्या पुरी तयार करून घेणे. चवीला खूप छान खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात. मुलांनाही खूप आवडतील.नक्की करून पहा.










