

भारतीय जनता पक्षाचे बुलडाणा तालुकाध्यक्ष ॲड.सुनिल हासनराव देशमुख यांच्या वाढदिवसां निमित्त बुलडाणा तालुक्यात खालील सामाजिक उपक्रमांचे आयोजन आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील,मा.आ.धृपदराव सावळे, मा.आ.विजयराज शिंदे व योगेंद्र गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

१) तालुक्यात पाऊस पडून शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटाचे सावट दुर व्हावे यासाठी ८ जुलै रोजी धाड येथील पावन असलेल्या श्री.बालाजी मंदिर येथे आरती सदरील कार्यक्रमाचे आयोजन भाजपा धाड शहराध्यक्ष विशाल विसपुते यांनी केले होते.
२) ॲड.सुनिल देशमुख यांच्या सेवा संपर्क कार्यालयात रक्तदानाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते, यावेळी शिवपूजन देखील करण्यात आले.
३) भाजपा व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष किरण पाटील धंदर यांनी धाड येतील स्मशानभूमीत वृक्षारोपणाचे आयोजन केले होते.
४) भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ.मायाताई पदमने यांनी मा.आ.विजयराज शिंदे यांच्या शिवालय संपर्क कार्यालयात कोरोना काळात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या महिला डॉक्टर,नर्स व सफाई कामगार महिलांचा साडी-चोळी व कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन सत्कार केला.
५) भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत यांच्या वतीने मासरूळ जिल्हापरिषद सर्कल मध्ये येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत कार्यालयास राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे वाटप ठेवण्यात आलेले आहे.
६) बुलडाणा तालुका भाजपा युवा मोर्चा च्या वतीने तालुक्यातील सर्व जिल्हापरिषद सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.
७) भाजपा बुलडाणा तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे व भाजपा सोशल मीडिया तालुकाध्यक्ष गणेश पांडे यांनी दहिद बु. येथे लसीकरण व वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील व दत्ता पाटील, विधी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड.मोहन पवार, पंचायत समिती सदस्य संदीप उगले, बुलडाणा नगरपालिका सदस्य मंदार बाहेकर, किसान आघाडीचे विलास पालकर, युवानेते पद्मनाभ बाहेकर, ज्येष्ठ नेते श्रीरंग येंडोले, देवराव कापरे, श्याम शिंब्रे, प्रकाश राऊत, विक्रम सोनुने, विश्वासराव देशमुख, भगवान पिंपळे, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष डॉ.अनिल जाधव, सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष गणेश पांडे, व्यापारी मोर्चाचे तालुकाध्यक्ष किरण धंदर, तालुका सरचिटणीस ॲड.दशरथसिंग राजपूत व जितेंद्र जैन, तालुका उपाध्यक्ष गजानन जाधव, पुरुषोत्तम भोंडे, देवेंद्र पायघन, जितेंद्र तायडे, कुलदीप पवार, तालुका सचिव अरुण भोंडे, शिवहरी मांटे, समाधान आघाव, राजू अपार, गजानन देशमुख, अनिल पालकर, इंद्रनाथ मांटे, शरद देशमुख, प्रमोद वाघ, सिध्दु लडके, समाधान पालकर, विशाल विसपुते, भागवत पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश राजपूत, समाधान मुरकुटे, गोपाल तायडे, सतीश पाटील, जयेश पडोळ, गजानन सपकाळ, प्रवीण गाडेकर, समाधान पडोळ, अमोल बारवाल, अर्जुन पाटील, मयूर पडोळ, सागर पवार, रवि बावस्कर, आशिष देशमुख, संतोष पालकर, अभिषेक वायकोस, शैलेश राजपूत, पवन गिरी, कृष्णा जाधव, प्रमोद गिरी ई. युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
महिला मोर्चा च्या कार्यक्रम प्रसंगी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर, म.मो.जिल्हा सरचिटणीस अल्काताई पाठक, म.मो.तालुक संघटक प्रमिला ताई डुकरे, भाजपा तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे, नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर,कौशल्याबाई शिंदे, सावळा जि.प सर्कल प्रमुख गणेश देहाडराय,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस यश तायडे, युवा मोर्चा शहर सरचिटणीस गौरव राठोड, बाळू ठाकरे,ऍड दशरथसिंग राजपूत,संजय जुंबड, रशीद शेख,दत्ता शिंदे,यतीन पाठक,संजय अग्रवाल,संजय दसरकर ई. मान्यवर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत यांनी सांगितले की ॲड.सुनिल देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. वेळे अभावी राहिले सामाजिक उपक्रम लवकरच घेण्यात येणार आहे.











