गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून एक महत्त्वाची बातमी आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनिल देशमुख यांनी स्वतः ट्विट करता याबाबतची माहिती दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणतात की, “आज (५ फेब्रुवारी) माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.”