वैभववाडी नगरपंचायतीत सात नगरसेवकांचा राजीनामा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नगरपंचायतीत (Vaibhavwadi Nagar Panchayat ) भाजपला मोठा (BJP) धक्का बसला आहे.

वैभववाडी नगरपंचायत निवडणूक 2021 (Vaibhavwadi Nagar Panchayat Election 2021) तोंडावर आली असताना भाजपच्या सात नगरसेवकांनी एकसाथ राजीनामा दिला आहे.

भाजपच्या सात नगरसेवकांसह इतरही आनेक प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत पक्षातील पदांचा राजीनामा दिला आहे.

वैभववाडी नगरपंचायतीत भाजप बहुमतात असला तरी एकहाती सत्तेला मात्र सुरुंग लागल्याची चर्चा कोकणात रंगली आहे. प्राप्त माहितीनुसार हे नगरसेवक हातावर शिवबंधन बांधत शिवसेना ( Shiv Sena) पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.

वैभववाडी नगरपंचायतीत एकूण 17 पैकी सर्वच्या सर्व नगरसेवक हे भाजपचे होते. त्यामुळे वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपचा एकहाती झेंडा होता. मात्र, पक्षांतर्गत कलह टोकाला गेल्याने भाजपच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागला.

7 नगरसेवकांनी राजीनामा दिला. त्यामुळे आता भाजपकडे फक्त 10 नगरसेवक राहिले आहेत