
यंदा आंगणेवाडीच्या जत्रेच्या उत्सवाचा आनंद भाविकांना घेता येणार नाही आहे. कारण भाविकांसाठी ही जत्रा रद्द करण्यात आल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.
आंगणेवाडीची यंदा जत्रा 6 मार्च रोजी असणार आहे. परंतु भाविकांना यावेळी जत्रेला उपस्थिती लावण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच उदय सामंत यांनी सुद्धा भाविकांना आंगणेवाडीच्या जत्रेच्या उत्सवासाठी येऊ नये असे आवाहन केले आहे. त्याचसोबत माझी जत्रा माझी जबाबदारी असे अभियान जत्रेसाठी राबवणार असल्याचे ही सामंत यांनी स्पष्ट केले आहे.देवीची जत्रा रद्द केली असली तरीही दोन दिवस धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत. तर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
आंगणेवाडीची जत्रा ही संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून त्यावेळी मोठी जत्रा सुद्धा भरवली जाते. याआधी भराडीदेवीच्या जत्रेचे आयोजन डिसेंबर महिन्यात पार पडणार होती. परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता ती रद्द केली होती.






