नदाल, मेदवेदेव उपांत्यपूर्व फेरीत

द्वितीय मानांकित राफेल नदाल आणि चतुर्थ मानांकित डॅनिल मेदवेदेव या मानांकित खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

आता नदालची गाठ स्टेफानोस त्सिटिपास याच्याशी पडेल, तर रशियाच्या मेदवेदेवपुढे आपलाच देशबांधव आंद्रे रुबलेव याचे आव्हान असेल.

स्पेनच्या राफेल नदालने इटलीच्या फॅबियो पह्गनीनी याचा 6-3, 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. ही लढत 2 तास 16 मिनिटांपर्यंत चालली. दुसऱया उपउपांत्यपूर्व लढतीत डॅनिल मेदवेदेवने अमेरिकेच्या मॅपेंजी मॅकडोनाल्डचा 6-4, 6-2, 6-3 असा एक तास 29 मिनिटांत पराभव करून अंतिम आठमध्ये प्रवेश केला.

आंद्रे रूबलेव – कॅस्पर रूड यांच्यामधील लढतीत कॅस्पर रूड याने माघार घेतली. त्यामुळे आंद्रे रूबलेवला पुढे चाल देण्यात आली. या लढतीत आंद्रे रूबलेव 6-2, 7-6 अशा फरकाने पुढे होता.